मुंबई : आपल्यापैकी जवळपास सर्वच लोक हे व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप आपल्या यूझर्सच्या सोयीसाठी नवनवीन अपडेट्स आणत असते. यापैकी एक सुविधा म्हणजे व्हॉट्सअॅपने व्हॉट्सअॅप प्लस सब्सक्रिप्शन सुरू केलंय.
हे सब्सक्रिप्शन घेणारे यूझर्स आता एकाचवेळी 20 चॅट पिन करू शकणार आहेत. यामुळे आवश्यक पर्सनल आणि ग्रप चॅट्स नेहमी वर दिसतील. यासह सब्सक्रिप्शनमध्ये एक्सक्लूसिव्ह स्टिकर्स, नवीन थीम आणि कस्टम अॅप आयकनसारखे फीचर्सही दिसतील. चला याविषयी जाणून घेऊया.
20 चॅट पिन करण्याची सुविधा
व्हॉट्सअॅप प्लस सब्सक्रिप्शन घेणारे यूझर्स आता आपल्या 20 पर्यंत आवश्यक चॅट्स या चॅट लिस्टमध्ये सर्वात वर पिन करू शकतात. यामुळे महत्वाच्या पर्सनल आणि ग्रुपवरील चॅट सहज दिसतील. यासह सामान्य फ्री व्हर्जनमध्ये चॅट पिन करण्याची मर्यादा ही 3 चॅटपर्यंत मर्यादित आहे. जासत् चॅट पिन करण्याचा ऑप्शन अशा लोकांसाठी उपयोगी ठरतो, जे रोज महत्वाच्या गोष्टी व्हॉट्सअॅपवर डिस्कस करतात.
चॅट पिन कशी करायची?
चॅट पिन करण्याची प्रोसेस पहिल्यासारखीच आहे. यासाठी तुम्हाला चॅट लिस्टमध्ये कोणत्याही चॅटवर काही सेकंदपर्यंत दाबून ठेवावं लागेल. यानंतर वर दिसलेल्या पिन आयकनवर टॅप करा. पिन केलेली चॅट नेहमी इनबॉक्सच्या वरच्या बाजूला दिसेल. ज्यामुळे वारंवार सर्च करणे किंवा खाली स्क्रोल करण्याची गरज राहणार नाही.
सब्सक्रिप्शनमध्ये मिळतील हे फायदे
व्हॉट्सअॅप प्लस सब्सक्रिप्शन 79 रुपयांमध्ये येतं. यात फक्त चॅट पिन करण्याची सुविधाच मिळत नाही. तर यासह यूझर्सला स्पेशल इफेक्टचे एक्सक्लूसिव्ह स्टिकर्सचा वापर करण्याचा ऑप्शनही मिळेल. यासह वेगवेगळ्या थीम आणि यूनिक अॅप आयकन निवडून व्हॉट्सअॅपचा लूक आपल्या आवडीनुसार बदलू शकता. या फीचर्सचा उद्देश यूझर्सला जास्त पर्सनलायजेशन देणे आहे.
कोणाला मिळेल हे फीचर
20 चॅट पिन करण्याची सुविधा सामान्य फ्री यूझर्ससाठी नाही. हे फीचर व्हॉट्सअॅप प्लस सब्सक्रिप्शन घेणाऱ्या यूझर्सला मिळतं. तर कोणत्याही सब्सक्रिप्शन नसणाऱ्या यूझर्सला जास्तीत जास्त 3 चॅट पिन करता येतील. यासह एक्सक्लूसिव्ह स्टिकर्स, कस्टम थीम आणि अॅप आयकनसारखे फीचर्सही फक्त व्हॉट्सअॅप प्लस सब्सक्रिप्शनला मिळतात. हे फीचर्स सामान्य फ्री यूझर्ससाठी नाहीत.