सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

मोठी बातमी! रमेश म्हात्रेंना हायकोर्टाकडून दिलासा, पण 'या' मोठ्या अटीने वाढवल्या अडचणी!

मोठी बातमी! रमेश म्हात्रेंना हायकोर्टाकडून दिलासा, पण 'या' मोठ्या अटीने वाढवल्या अडचणी!
मोठी बातमी! रमेश म्हात्रेंना हायकोर्टाकडून दिलासा, पण 'या' मोठ्या अटीने वाढवल्या अडचणी!

डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण प्रकरणी मोठी खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान, या प्रकरणी रमेश म्हात्रेंना जामीन मिळाला असून, मात्र हायकोर्टाने म्हात्रेंना मोठा दणका दिला आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर पालिका रुग्णालयात महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने कठोर अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.

६ जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयातील NICU विभाग फुल्ल असल्याने डॉक्टरांनी एका नवजात बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. यावरून झालेल्या वादातून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला होता आणि पोलिसांकडून म्हात्रेंसह अन्य आरोपींना ८ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने अत्यंत कडक अटी लादल्या आहेत. आरोपींना खटल्यादरम्यान महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार असून, गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहून आठवड्यातून तीनदा स्थानिक पोलिसांकडे हजेरी लावावी लागेल. तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्यास आणि पीडितांशी संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. हा खटला जलदगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवला जाणार आहे.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →