सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

सांगलीत खळबळ: खून करून फरार झालेला सराईत गुंड लखन इसरडे एलसीबीच्या जाळ्यात; मिरज टोलनाक्यावर रचला थरारक सापळा!​

सांगलीत खळबळ: खून करून फरार झालेला सराईत गुंड लखन इसरडे एलसीबीच्या जाळ्यात; मिरज टोलनाक्यावर रचला थरारक सापळा!​
सांगलीत खळबळ: खून करून फरार झालेला सराईत गुंड लखन इसरडे एलसीबीच्या जाळ्यात; मिरज टोलनाक्यावर रचला थरारक सापळा!
​


सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपी लखन पंडित इसरडे (वय ३५, रा. टिंबर एरिया, नवीन वसाहत, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. मिरज-म्हैशाळ रोडवरील टोलनाक्याजवळ ही धडक कारवाई करण्यात आली.


​गोपनीय माहितीच्या आधारे रचला सापळा

सांगली शहर पोलीस ठाण्यातील नोंद क्र. २९०/२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल झालेला आरोपी लखन इसरडे हा घटनेनंतर पसार झाला होता. पोलीस त्याच्या शोधात असतानाच, आरोपी म्हैशाळ रोड, मिरज येथील टोलनाक्यावर येणार असल्याची पक्की बातमी एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सुभाष सूर्यवंशी व पोलीस हवालदार संदीप नलावडे यांना गोपनीय माहितीदाराकडून मिळाली.

​एलसीबीच्या पथकाची धडक कारवाई

माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, एएसआय सुभाष सूर्यवंशी, पोलीस हवालदार मुळे (बकल नं. ५८५), पोलीस शिपाई विनायक सुतार (बकल नं. २२४) आणि पोलीस शिपाई होळकर (बकल नं. १४७९) यांच्या पथकाने 
म्हैशाळ रोडवर सापळा रचला.

संशयित आरोपी लखन या परिसरात येताच सतर्क पोलीस पथकाने चहूबाजूंनी वेढा घालून त्याला जागीच जेरबंद केले.
​पुढील तपासासाठी सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन
अटक करण्यात आलेल्या आरोपी लखन इसरडे याला पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपासासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांतून पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →