सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

कर्णकर्कश ‘फटाक्यां’ना पोलिसांचा चाबूक! सांगलीत एकाच दिवसात २८ ‘बुलेट राजां’चे मॉडिफाईड सायलन्सर जप्त​

कर्णकर्कश ‘फटाक्यां’ना पोलिसांचा चाबूक! सांगलीत एकाच दिवसात २८ ‘बुलेट राजां’चे मॉडिफाईड सायलन्सर जप्त​
कर्णकर्कश ‘फटाक्यां’ना पोलिसांचा चाबूक! सांगलीत एकाच दिवसात २८ ‘बुलेट राजां’चे मॉडिफाईड सायलन्सर जप्त


​सांगली :- रस्त्यावरून सुसाट धावत कानठळ्या बसवणारे आवाज काढणे आणि सायलन्सरमध्ये बेकायदेशीर फेरबदल करून निष्पाप नागरिकांची झोप हराम करणाऱ्या हुल्लडबाजांवर सांगली पोलिसांनी अखेर कारवाईचा आसूड ओढला आहे. सांगली शहर वाहतूक शाखेने मंगळवारी जिल्हाभर धडक मोहीम राबवत एकाच दिवसात तब्बल २८ मॉडिफाईड सायलन्सर जप्त केले. या धडाकेबाज कारवाईमुळे सांगलीतील बेशिस्त 'बुलेट राजांचे' धाबे पार दणाणले आहेत.

​पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या थेट आदेशावरून वाहतूक शाखेचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांपासून फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या गाड्यांचा सुळसुळाट झाला होता. याचा सर्वाधिक त्रास रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होत होता.

​दंड नाही, थेट सायलन्सर जप्त!
या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांनी केवळ दंडात्मक पावती फाडून चालकांना सोडलेले नाही. निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमबाह्य फेरबदल केलेले सायलेन्सर गाड्यांवरून जागच्या जागी काढून जप्त करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे, तर चालकांना कंपनीचा मूळ सायलन्सर गाडीला बसवून घेण्यास भाग पाडले जात आहे.

​कारवाईची प्रमुख वैशिष्ट्ये:

​थेट जप्ती: नियम मोडणाऱ्या २८ वाहनांचे अनधिकृत सायलन्सर जागेवरच जप्त.

​मूळ सायलन्सर अनिवार्य: मूळ सायलन्सर बसवल्याशिवाय वाहन रस्त्यावर आणण्यास मनाई.
​दुहेरी फटका: फेरबदल केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाईचा बडगा.

​१५ दिवसांचा ‘मेगा प्लॅन’: येत्या 

१५ दिवसांत अशा बेशिस्त वाहनचालकांचा पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम लागू.
​पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सांगलीकरांनी सुटकेचा विश्वास सोडला असून, या कारवाईचे नागरिकांकडून सर्वत्र जोरदार स्वागत केले जात आहे.

Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →