सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

लाचलुचपत विभागाचा सर्जिकल स्ट्राईक: सांगली झेडपीच्या माजी अधिकाऱ्याविरुद्ध ८३ लाखांच्या बेकायदेशीर मालमत्तेचा गुन्हा दाखल!

लाचलुचपत विभागाचा सर्जिकल स्ट्राईक: सांगली झेडपीच्या माजी अधिकाऱ्याविरुद्ध ८३ लाखांच्या बेकायदेशीर मालमत्तेचा गुन्हा दाखल!
लाचलुचपत विभागाचा सर्जिकल स्ट्राईक: सांगली झेडपीच्या माजी अधिकाऱ्याविरुद्ध ८३ लाखांच्या बेकायदेशीर मालमत्तेचा गुन्हा दाखल!


उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल ८२ लाख ८९ हजार ६४१ रुपये (८४.२३ टक्के) इतकी अफाट अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याप्रकरणी जिल्हा परिषद सांगलीचे सेवानिवृत्त कनिष्ठ लेखाधिकारी अण्णासाहेब मलगौंडा पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली अण्णासाहेब पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली कडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अण्णासाहेब मलगौंडा पाटील (वय ६५ वर्ष, रा. सरस्वतीनगर, विश्रामबाग, सांगली) हे सांगली जिल्हा परिषदेत वर्ग-३ चे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. 
त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक रक्कम पतसंस्थेत गुंतवणूक केल्याची व करचुकवेगिरी केल्याची तक्रार पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे २८ ऑगस्ट २०१८ रोजी प्राप्त झाली होती.  या तक्रारीच्या आधारे आयकर अधिनियम व इतर नियमांनुसार सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अण्णासाहेब पाटील यांच्या मालमत्तेची उघड चौकशी (Open Enquiry) करण्यात आली.
८४.२३% अधिक अपसंपदा उघड

दिनांक ०२/१२/१९९६ ते ३१/०५/२०२० या २३ वर्षांहून अधिक कालावधीतील त्यांच्या जमा-खर्चाचे व मालमत्तेचे परीक्षण (Check Period) करण्यात आले. या उघड चौकशीदरम्यान सेवानिवृत्त लोकसेवक अण्णासाहेब पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली पाटील (वय ६० वर्षे, गृहिणी) यांनी आपापसात संगनमत करून ज्ञात उत्पन्नाच्या प्रमाणाशी विसंगत असलेली तब्बल ८२,८९,६४१ रुपये (+८४.२३%) इतकी अपसंपदा अप्रामाणिक व भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक योगेश रमेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून आरोपींवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याची कलमे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १३(१) (ई) सहवाचन १३ (२), भ्रष्टाचार प्रतिबंध सुधारित अधिनियम २०१८ चे कलम १३ (१) (ब) सह १३ (२) आणि भारतीय दंड संहिता कलम १०९ अशी असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५(३) अन्वये दिनांक ०४/०८/२०२६ रोजी आरोपींना हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक यास्मिन इनामदार (ACB सांगली) यांच्या पथकाने केली आहे.


Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →