सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

​"मी कुणाला भेटायचं हे मी ठरवणार!" अभिजीत दिपकेंचा थेट पोलिसांवर हल्लाबोल; उद्धट वागणूक देणाऱ्या PSI ला घरातून हाकलले!

​"मी कुणाला भेटायचं हे मी ठरवणार!" अभिजीत दिपकेंचा थेट पोलिसांवर हल्लाबोल; उद्धट वागणूक देणाऱ्या PSI ला घरातून हाकलले!
​"मी कुणाला भेटायचं हे मी ठरवणार!" अभिजीत दिपकेंचा थेट पोलिसांवर हल्लाबोल; उद्धट वागणूक देणाऱ्या PSI ला घरातून हाकलले!



दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीच्या यशस्वी आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी भेटीसाठी नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे.


अशातच काही पोलीस अधिकारी त्यांच्या संरक्षणासाठी देखील तैनात आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अभिजीत दिपकेंनी PSI ला घराबाहेर हाकलून लावल्याचं समोर आलं आहे. त्यावर अभिजीत दिपके यांनी अधिकाऱ्याची तक्रार देखील केलीय.

पोलीस उपनिरीक्षकाला घराबाहेर काढलं


सोशल मीडियावर अभिजीत दिपके यांचा एक होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) थेट घराबाहेर काढलं. या व्हिडीओमध्ये आपल्याला भेटण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलीस अत्यंत उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. मी कुणाला भेटायचं, हे पोलिसांनी सांगण्याची गरज नाही. मी कुणाला भेटणार हे केवळ मीच ठरवणार, असं अभिजीत दिपके यांनी पोलिसांना ठणकावून सांगितलं.

आक्रमक भाषेत पोलीस अधिकाऱ्याला झापलं

वाद झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आक्रमक भाषेत पोलीस अधिकाऱ्याला झापलं अन् घराबाहेर जाण्याची विनंती केली. त्यावेळी इतर लोकांनी अभिजीतला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या वागणुकीनंतर अभिजीत दिपके यांनी पोलीस उपायुक्तांना फोन केला. फोनवर अधिकाऱ्याची तक्रार केली. हा अधिकारी मला इथं नकोय, असं पोलीस उपायुक्तांना अभिजीत दिपके यांची विनंती केली.

कॉक्रोजॉला संपवण्यासाठी हिट स्प्रेचा वापर

सीआयडी अधिकारी सांगून काही लोक माझ्या घरासमोर आहेत. तुमच्याच पोलिसांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आम्ही सीआयडी अधिकारी आहोत असं सांगितलं. ही सीआयडी अधिकारी हिट स्प्रे नावाच्या ग्रुपमध्ये आहेत, आम्हाला म्हणजेच कॉक्रोजॉला संपवण्यासाठी हिट स्प्रेचा वापर करू असं सांगितलं जातं आणि अधिकारी त्या ग्रुपमध्ये असेल तर त्याचा अर्थ काय? असा सवाल दिपकेंनी अधिकाऱ्यांना विचारला. सीआयडीचे हे लोक माझ्या घरासमोर उभे राहून व्हाट्स अॅपवर रिपोर्ट करत आहेत, अशी तक्रार देखील पोलीस उपायुक्तांना केली आहे.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →