सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो पण. गुंगी गुडिया उल्लेखावर झिरवाळ हे काय बोलून गेले?

एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो पण. गुंगी गुडिया उल्लेखावर झिरवाळ हे काय बोलून गेले?
एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो पण. गुंगी गुडिया उल्लेखावर झिरवाळ हे काय बोलून गेले?


काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. सुनेत्रा पवार यांनी स्वत:कडे राज्याचं अर्थखातं घ्यावं आणि आपण गुंगी गुडिया नसल्याचं सिद्ध करावं, असं आव्हानच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय. काँग्रेसच्या गुंगी गुडिया उल्लेखानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेसने याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही सत्ताधारी पक्षाकडून केली जातेय. दरम्यान, आता याच प्रकरणावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. एक वेळी मी ताटाखालच्या मांजरासारखा वाटू शकतो पण सुनेत्रा ताई तशा नाहीत, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

पूर्वी इंदिरा गांधी यांना…

ताईंना जर गुंगी गुडिया म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. मी एकतर गावठी माणूस आहे. मी काँग्रेसच्या लोकांना काहीही बोलून जाईल. पूर्वी इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटले गेले होते. पण आपण आज क्षणोक्षणी त्यांची आठवण करत असतो. ताईंच्या घरात राजकारण आणि माहेरमध्येही राजकारण आहे. एक दिवस नक्की येईल जेव्हा इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे आपण सुनेत्रा ताईंना पाहू, असं मत झिरवाळ यांनी व्यक्त केलं.

एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो..
सुनेत्रा पवार या गुंगी गुडिया तर आहेतच. पण भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे हाल होत आहेत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कोणतीही फाईल क्लियर होत नाही. त्यांच्या विभागाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष देत नाहीत. अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष नरेंद्र मोदी, अमित शाहा यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे, अशी घणाघाती टीका कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. यावरही झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिवसेंदिवस वाढ होत आहे. एखाद्याला भेटायला जाणं म्हणजे ताटाखालचं मांजर होणं नसतं. एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो. पण सुनेत्रा ताई नाहीत, असा प्रत्युत्तर झिरवाळ यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना दिलं.


Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →