सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

पुणे :- वेदनादायक! पुण्यात क्रूरतेची सर्व हद्द पार; ९ महिन्यांच्या चिमुकल्याच्या तोंडात ओतलं फेविक्विक, तिघांवर गुन्हा दाखल

पुणे :- वेदनादायक! पुण्यात क्रूरतेची सर्व हद्द पार; ९ महिन्यांच्या चिमुकल्याच्या तोंडात ओतलं फेविक्विक, तिघांवर गुन्हा दाखल
पुणे :- वेदनादायक! पुण्यात क्रूरतेची सर्व हद्द पार; ९ महिन्यांच्या चिमुकल्याच्या तोंडात ओतलं फेविक्विक, तिघांवर गुन्हा दाखल


पुण्यात अतिशय संतापजनक आणि माणूसपणाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये एका नऊ महिन्याच्या बाळाच्या तोंडात चक्क फेविक्विक ओतलं आहे. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी सानिया शेख या महिलेसह इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्याच्या लोहगावमध्ये अमानूष कृत्याचा हा कळस झाला आहे. कौटुंबिक वादातून अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा प्रकार घडला. घटनेत जखमी झालेल्या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्ताफ नबी शेख यांनी पोलिसात फिर्याद दिली असून ही घटना दि. ३१ जुलै रोजी कलवड वस्ती भागात घडली.
फिर्यादी यांची पत्नी जैनाब आणि तिची भावजय सानिया शेख यांच्यात काही कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. या वादाचा राग मनात धरून आरोपी सानिया शेखने घरात झोपलेल्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेबाबत कुणालाही माहिती दिली किंवा पोलिसांत फिर्याद दिली तर जीवे मारण्याची धमकी आरोपी सानियाने दिली. तसेच इतर दोन आरोपींनीदेखील फिर्यादीला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या संतापजनक घटनेनंतर तातडीने बाळाच्या आईने बाळाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. सध्या या बाळावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तक्रारीनंतर लोहगाव पोलिसांनी सानिया शेखसह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →