सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळले, लाठीचार्ज, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा

झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळले, लाठीचार्ज, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळले, लाठीचार्ज, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा

झारखंड लोकसेवा आयोगातील घोटाळय़ाच्या विरोधात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आज कमालीचे चिघळले. विद्यार्थी नेते देवेंद्र महातो यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आज विधान भवनावर धडक मोर्चा काढला.

विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अश्रुधूर व पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सरकारशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेच वाढला आहे.

झारखंड लोकसेवा आयोगात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी तीन आठवडय़ांपासून रांचीत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. देवेंद्र महातो यांच्या नेतृत्वाखाली काही विद्यार्थी बेमुदत उपोषणही करत आहेत. हेमंत सोरेन सरकारने विद्यार्थ्यांशी तीन वेळा चर्चा केली, मात्र त्यातून काहीही मार्ग निघाला नाही. त्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांनी विधान भवनावर धडक दिली. त्यासाठी रविवारी रात्रीपासूनच रांचीतील जयपालसिंह मुंडा मैदानावर विद्यार्थी जमले होते.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी विधान भवनाच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून अडथळे निर्माण करण्यात आले, मात्र हे अडथळे पार करून विद्यार्थी विधान भवनाकडे निघाले. विधान भवनाच्या जवळ पोलिसांनी काटेरी तारा लावल्या. या काटेरी तारा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱया विद्यार्थ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पाण्याचे फवारे सोडले. तरीही आंदोलक मागे हटत नसल्याने अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडण्यात आल्या. त्यानंतरही काही विद्यार्थी विधान भवनापर्यंत पोहोचले.

जेपीएससीच्या माजी अध्यक्षाला अटक

झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल. ख्यांगते यांच्यावर विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष आहे. विद्यार्थ्यांचा हा रोष कमी करण्यासाठी आज ख्यांगते यांना अटक करण्यात आली. सीआयडी पोलिसांनी ही कारवाई केली. 21 जुलै रोजी जेपीएससीच्या कार्यालयावर सीआयडीने धाड टाकल्यानंतर ख्यांगते यांनी राजीनामा दिला होता. राज्यपाल संतोष गंगवार यांनी हा राजीनामा मंजूरही केला होता. आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →