सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

"माझी किंमत १४० रुपये लावणाऱ्यांनो..." गलिच्छ ट्रॉलिंगवर रिया भडकली; भरचौकात पोलिसांची गाडी अडवून केला गौप्यस्फोट!

"माझी किंमत १४० रुपये लावणाऱ्यांनो..." गलिच्छ ट्रॉलिंगवर रिया भडकली; भरचौकात पोलिसांची गाडी अडवून केला गौप्यस्फोट!
"माझी किंमत १४० रुपये लावणाऱ्यांनो..." गलिच्छ ट्रॉलिंगवर रिया भडकली; भरचौकात पोलिसांची गाडी अडवून केला गौप्यस्फोट!

दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थांच्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशावर पाहायला मिळाले. मुबंईत देखील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईत तरुणांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर प्रचंड प्रसिद्ध झाली आहे.

सोशल मीडियातून रियाच्या या धाडसाचं कौतुक होत आहे. तसंच तिच्यावर टीकाही होत आहे. तिला ट्रोल केलं जात आहे. तसेच तिच्याविषयी नको नको ते बोलले जात आहे. आता रियाने राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सहभागी होऊन मोठे वक्तव्य केले आहे.

माध्यमांशी बोलताना रिया म्हणाली की, माझे नाव आहे रिया अहिर. मी ती मुलगी आहे जी मुंबई पोलिसांच्या समोर आली होती. तुम्ही असे म्हणत आहात की ही ती मुलगी आहे जी व्हायरल झाली आहे. जिने मुंबई पोलिसांना थाबवले. पण मी माध्यमांना सांगू इच्छिते की मी ती मुलगी आहे जिने 20 मुलांना अनलॉफुली डिटेन होण्यापासून वाचवले होते. कृपया तुमचा नरेटीव्ह बदला, तुमचा दृष्टिकोन बदला. पण मी जे काही केले त्यामुळे माझा छळ केला जात आहे.

पुढे ती म्हणाली, मी याला ट्रोलिंग म्हणणार नाही. कारण हे ट्रोलिंग नाहीये हा गुन्हा आहे. केवळ इतकेच नाही तर पक्षाचे कार्यकर्ते देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. ते माझ्याविषयी चुकीचे बोलत आहेत.


मी जे काही करत आहे ते 140 रुपयांमध्ये देहविक्री करुन करत आहे असे ते म्हणत आहे. तुम्ही स्वत: विचार करा त्यांच्या डोक्यात किती घाण भरली आहे असे रिया म्हणाली.

27 तारखेला मी गुन्हा दाखल केला, आज 5 तारीख आहे माझ्या हाताता एफआयआरदेखील नाही. हे ना मुलींना शिकू देत आहेत ना मुलींना वाचवत आहेत. मी फक्त तुम्हाला इतकेच सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांसाठी मी उभी होते ते माझ्यासाठी उभे आहेत. आपली देखील जबाबदारी आहे की आपण एकमेकांसाठी उभे राहायला हवे असे रिया पुढे म्हणाली.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →