सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

​सांगली हादरली! शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात, ६ वर्षांच्या चिमुकलीचा अंत

​सांगली हादरली! शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात, ६ वर्षांच्या चिमुकलीचा अंत
​सांगली हादरली! शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात, ६ वर्षांच्या चिमुकलीचा अंत

सांगली : मुंबईत गेल्या महिन्यात शाळेच्या बसवर झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला, तसेच मुंबई महापालिकेनं घटनेसंदर्भाने काही अधिकाऱ्यांवर कारवाया देखील केल्याचं पाहायला मिळालं.

आता, सांगली  जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील आटूगडेवाडी येथे चारचाकी स्कूल व्हॅनच्या चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात  सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदद्रावक घटना घडली. तर, व्हॅनमधील इतरही मुले देखील जखमी झाली असून, त्यांच्यावर कोकरूड, शिराळा आणि कराड येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिराळा येथील सह्याद्री पब्लिक स्कूलची इंग्रजी माध्यमाची दुसरी शाखा वाघमारेवाडी येथे वर्षभरापूर्वी सुरू झाली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शेडगेवाडी येथील युवराज कदम यांची चारचाकी (क्र. एमएच १० ईई ७९३१) वापरली जाते. आटूगडेवाडी येथील एका विद्यार्थ्याला आणण्यासाठी ते गेले होते. विद्यार्थ्याला घेऊन परतत असताना आटूगडेवाडी येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर चारचाकी रस्त्यालगतच्या पुलाच्या कठड्यावर जोरदार आदळली. या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेली श्रीशा श्रीनाथ ऊर्फ गणेश इंगळे (वय ६, रा. मेणी) हिचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य मुले जखमी झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी कोकरूड, शिराळा आणि कराड येथील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, स्कूल बस किंवा लहान मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहेत.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →