सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

सांगलीत टॉवरवर चढून प्रियकराचा हाय व्होल्टेज ड्रामा! पोलिसांचा घाम सुटला, शेवटी एका Video Call ने निभावला प्रसंग!

सांगलीत टॉवरवर चढून प्रियकराचा हाय व्होल्टेज ड्रामा! पोलिसांचा घाम सुटला, शेवटी एका Video Call ने निभावला प्रसंग!
सांगलीत टॉवरवर चढून प्रियकराचा हाय व्होल्टेज ड्रामा! पोलिसांचा घाम सुटला, शेवटी एका Video Call ने निभावला प्रसंग!

सांगली : शोले सिनेमामध्ये बसंतीसाठी विरू थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याचे आपण पाहिले असेल पण सांगलीत प्रेयसीच्या होकारासाठी एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रेमवीराने थेट मोबाईल टॉवर वर चढून धिंगाणा घातला.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस, अग्निशमन दलासह शासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.

सांगलीच्या कुपवाड परिसरात आज दुपारी ही घटना घडली. 'प्रेयसी घटनास्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नाही', अशी भूमिका तरुणाने घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अजय जाधव असे या तरुणाचे नाव आहे.
प्रेयसीने आपल्याला होकार द्यावा, तरूण मोबाईल टॉवरवर चढला

सांगलीतील कुपवाड जवळ राहणारा अजय जाधव हा आज दुपारी अचानक गगनचुंबी मोबाईल टॉवरवर जाऊन बसला. प्रेयसीने आपल्याला होकार द्यावा, अशी मागणी करत तो मोबाईल टॉवरवर चढला. त्यानंतर प्रेयसी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नसल्याचे त्याने सांगितले. याची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे पथक तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

'विरू'ला पाहण्यासाठी परिसरात गर्दी

तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरविण्यासाठी पोलिसांकडून त्याच्याशी संवाद साधण्याचे आणि समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने मोबाईल टॉवरच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. तरुण टॉवरवर चढल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
व्हिडिओ कॉल करून तरुणाला आश्वासन

या प्रकारामुळे उपस्थितांना जुन्या 'शोले' चित्रपटातील धर्मेंद्रने पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या प्रेमाच्या नाट्यमय प्रसंगाची आठवण झाली. एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे व त्यांच्या पथकाने अथक प्रयत्नाने व्हिडिओ कॉल करून तरुणाला आश्वासन दिल्याने दोन तासानंतर खाली उतरण्यास प्रवृत्त केले.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →