सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याला मध्यरात्री अटक, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याला मध्यरात्री अटक, महाराष्ट्रात राजकीय खळबळ
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याला मध्यरात्री अटक, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नंदुरबारमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.

भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विजय चौधरी यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणी  करण्यात आली असून, त्यानंतर त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या मोठ्या नेत्यांशी संबंधित काही कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. याप्रकरणी माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाने तक्रार दाखल केल्यानंतर विजय चौधरी यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नंदुरबारमधील भाजपचे माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांच्या काही कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिप्समध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित आणि त्यांच्या कुटुंबाबाबत अतिशय अर्वाच्य, आक्षेपार्ह आणि जातिवाचक (कथित) भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांनी तक्रार नोंदवल्यानंतर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विजय चौधरी यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विजय चौधरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या सर्व ऑडिओ क्लिप्स 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्या असून मला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे राजकीय षड्यंत्र आहे, असा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →