१ ऑगस्टच्या संध्याकाळी तो हॉटेलच्या खोलीत शिरला तो बाहेर आलाच नाही. सलग तीन दिवस खोलीचा दरवाजा आतून बंद होता. खोलीतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. अखेर ४ ऑगस्टला पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी जेव्हा खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला, तेव्हा बेडवर पडलेला मृतदेह आणि शेजारी ठेवलेले एक विशेष उपकरण पाहून पोलीसही चक्रावून गेले. कोण होता हा तरुण आणि काय घडले होते त्या बंद खोलीत?
जुगाराची सवय अन् कर्जाचा डोंगर
हैदराबादमध्ये एका खाजगी कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून 33 वर्षीय संतोष कुमार काम करत होता. संतोष कुमार याला ऑनलाईन बेटिंगची प्रचंड सवय होती. बाहेरून यशस्वी वाटणारा हा तरुण पडद्यामागे जुगाराच्या भयानक दलदलीत अडकला होता. मोबाईलच्या स्क्रीनवर खेळल्या गेलेल्या या खेळांमुळे त्याच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले. कुटुंबाने त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. त्याने त्याचा हैदराबादमधील राहता फ्लॅटही विकला, परंतु जुगाराच्या विळख्यातून त्याची सुटका झाली नाही.
युट्यूबवरून शोधला मार्ग अन् खरेदी केले साहित्य
हे वाढत कर्ज आणि ओझं संतोष कुमारला असह्य झालं होतं. अखेर त्याने हे सगळ संपवण्याचा प्रयत्न केला. मानसिक तणावाच्या छायेखाली संतोषने अखेर इंटरनेट आणि युट्यूबवर जीवन संपवयाच्या पद्धती शोधण्यास सुरवात केली. त्यात त्याला हीलियम गॅसच्या वापर पद्धतीबद्दल समजले. यानंतर त्याने हैदराबादच्या बालनगर भागातून एक हीलियम गॅसचा सिलिंडर आणि नळीसह मास्क खरेदी केला.
हॉटेलमध्ये भयानक शेवट
१ ऑगस्ट रोजी तो सिद्दीपेट येथील 'हरिता हॉटेल'मध्ये पोहोचला आणि रूम बुक करून आत गेला. बंद खोलीत मास्कच्या साहाय्याने हीलियम गॅस घेतल्याने ऑक्सिजनच्या अभावामुळे त्याचा श्वास गुदमरला. त्याच खोलीत श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला. सलग तीन दिवस खोलीतून कोणतीही हालचाल झाली नाही. यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी बऱ्याच वेळ खोली वाजवण्याचा प्रयत्न केला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, हॉटेल कर्मचाऱ्यांनी ४ ऑगस्ट रोजी पोलिसांना पाचारण केले.
पोलिस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. त्यांना संतोषचा मृतदेह, हीलियम सिलिंडर आणि एक सुसाइड नोट आढळली. "ऑनलाईन जुगारामुळे माझे सर्वकाही संपले, मला माफ करा..." असे लिहीत या चार्टर्ड अकाउंटंटने आपल्या आयुष्याचा करुण अंत केला.