सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

मल्ल्या-मोदी तर फक्त झांकी, ५४ महाघोटाळेबाज देश सोडून फरार! जनतेच्या घामाचा पैसा लुटणाऱ्यांचा धक्कादायक कट उघड

मल्ल्या-मोदी तर फक्त झांकी, ५४ महाघोटाळेबाज देश सोडून फरार! जनतेच्या घामाचा पैसा लुटणाऱ्यांचा धक्कादायक कट उघड
मल्ल्या-मोदी तर फक्त झांकी, ५४ महाघोटाळेबाज देश सोडून फरार! जनतेच्या घामाचा पैसा लुटणाऱ्यांचा धक्कादायक कट उघड

बँकांची हजारो कोटींची फसवणूक करून देशाबाहेर पळून जाणारे म्हटलं की विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांचे नावे डोळ्यांसमोर येतात. मात्र, हे केवळ एका मोठ्या हिमनगाचे टोक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, बँक फसवणुकीच्या सुमारे ३२ प्रकरणांमध्ये तब्बल ५४ आरोपी देश सोडून फरार झाले आहेत. या सर्वांवर ‘पीएमएलए’ (PMLA) कायद्यांतर्गत ईडीकडून कारवाई सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी दिली.

फरार आरोपींची ८४०.६८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

केंद्र सरकारकडून फरार आरोपींविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात आली असून रेड कॉर्नर, ब्लू कॉर्नर यांसारख्या विविध नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ अंतर्गत कारवाई सुरू करणे आणि परदेशातून आरोपींच्या प्रत्यार्पणाची मागणी करणे इत्यादींचा समावेश आहे. अशा २७ आरोपींविरुद्ध फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी ९ जणांना संबंधित न्यायालयांनी ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केले असून, त्यांच्या मालकीची ८४०.६८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच, १८ आरोपींविरुद्ध प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि पीएमएलए, २००२ च्या तरतुदींनुसार ३५,१६६.२८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यापैकी १५,१८४.१९ कोटी रुपयांची मालमत्ता अंतिमरीत्या जप्त करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत ५४ फरार आरोपींची नावे एकाच यादीत एकत्रितपणे जाहीर केलेली नसली, तरी ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ (FEOA) आणि PMLA अंतर्गत तपास यंत्रणांच्या (ED/CBI) यादीत समाविष्ट असलेली प्रमुख आणि प्रसिद्ध नावे खालीलप्रमाणे आहेत.

१. न्यायालयात ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित झालेले प्रमुख आरोपी

विजय मल्ल्या : किंगफिशर एअरलाइन्सचे प्रमुख. भारतीय बँकांचे सुमारे ९,००० कोटी रुपयांचे कर्ज न फेडता ब्रिटनला पळून गेले.
नीरव मोदी : पंजाब नॅशनल बँक १३,००० कोटी रुपयांहून अधिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी. सध्या लंडनच्या तुरुंगात असून त्याच्या प्रत्यर्पणाची कारवाई सुरू आहे.
मेहुल चोक्सी : गीतांजली जेम्सचा मालक आणि नीरव मोदीचा मामा. PNB घोटाळ्यानंतर अँटिगा आणि बारबुडा येथे नागरिकत्व घेऊन पळाला.
नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा : स्टर्लिंग बायोटेक ग्रुपचे प्रवर्तक. सुमारे १४,५०० कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचे आरोप.
दीप्ती संदेसरा : स्टर्लिंग बायोटेक प्रकरणातील सह-आरोपी.
पुष्पेश कुमार बैद : नॅशनल स्पॉट एक्सचेंज आणि वित्तीय घोटाळ्यातील आरोपी.
सुदर्शन व्यंकटरामन आणि रामानुजम शेषरत्नम : झायलॉग सिस्टम्स बँक फसवणूक प्रकरण.

२. इतर प्रमुख फरार आणि चौकशीअंतर्गत असलेले व्यावसायिक

जतिन मेहता : विनसम डायमंड्स कंपनीचा मालक. विविध बँकांचे सुमारे ६,८०० कोटी रुपये थकवून कॅरिबियन बेट सेंट किट्स येथे पळून गेला.
संजय भंडारी : संरक्षण क्षेत्रातील शस्त्र दलाल आणि मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोपी.
ललित मोदी : आयपीएलचे माजी आयुक्त, वित्तीय गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी.
अमी मोदी आणि निशाल मोदी: नीरव मोदीचे कुटुंबिय/भागीदार (PNB घोटाळा प्रकरण).
रितेश जैन : राजेश एक्स्पोर्ट्सशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरण.
टीप: या ५४ आरोपींमध्ये १५ जणांना न्यायालयाने अधिकृतपणे ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित केले आहे, तर उर्वरित आरोपींवर रेड/ब्लू कॉर्नर नोटीस, प्रत्यर्पण आणि मालमत्ता जप्तीची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →